February 7, 2026 2:43 pm

जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन संपन्न

जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे

79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
कळमेश्वर :  तालुक्यातील आदर्श शाळा जि. प. उच्च प्राथमिक शाळा तिडंगी येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात व दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात दरवर्षी प्रमाणे प्रभात फेरीने झाली. ध्वजपूजन व ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन राउत यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत घेऊन पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.
                          यावर्षी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण व वैशिष्टय़ म्हणजे मुलांच्या विविध कलागुण विकसित करण्यासाठी त्यांना मिळालेले व्यासपीठ होय. मुलांनी यावेळी कवायत, एअरोबिक्स, संगीत नृत्य, कृतिगिते, गीत गायन, भाषणे या सर्व गोष्टींचे सादरीकरण अतिशय सुंदररीत्या केले

                           कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन तिडंगी गावचे सरपंच रामभाऊजी मारबते तर उपसरपंच घनश्याम अंबरते, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वैशालीताई खाटिक आणि सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत तिडंगीचे सर्व आजी माजी सदस्य,सचिव, कर्मचारी,आरोग्य निरीक्षक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी कर्मचारी, शीतलताई खाटिक पोलिस पाटील आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
मागील वर्षी वर्ग आठवी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या कु. पूनम प्रकाश लखमापुरे व कु. मनस्वी छन्नूजी राऊत या दोन विद्यार्थिनींचा रोख रक्कम देऊन विशेष गौरव करण्यात आला. हे रोख बक्षीस गावातील प्रतिष्ठित नागरिक भाऊराव घुगल गुरुजी, सरपंच रामभाऊ मारबते आणि  अमोल कृष्णाजी घुगल यांनी शाळेला देणगी म्हणुन दिलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दिले जाते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक के. एस. म्हसे, जेष्ठ शिक्षिका रजनी सोनकुसरे,  सारिका पाचखंडे, निकिता बेलेकर,  बी. ए. डमाळे, पी. पी. नेरकर यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक नेरकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक म्हसे व आभार प्रदर्शन डमाळे यांनी केले. विद्यार्थ्यांंना खाऊ वाटप करण्यात आला. शेवटी राष्ट्रीय गीत वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

0
0

Leave a Reply

Realted News