तळेगाव सेवाश्रमचे संचालक आचार्य प्रफुल दादांना अखेरचा निरोप..

आचार्य प्रफुल दादांना अखेरचा निरोप

अनुयायांना अश्रू अनावर… ब्राम्हणवाडा येथे अंत्यसंस्कार

का टा वृत्तसेवा : परमानंद मुदगल
कारंजा/ प्रतिनिधी : मानव विकास ज्ञान साधना सेवाश्रम तळेगाव येथील आश्रमाचे संचालक आचार्य प्रफुल्ल दादा वाघधरे यांचे नुकतेच श्रीलंकेत झालेल्या केबल कार अपघातात निधन झाले. कारंजा तालुक्यात असलेल्या त्यांच्या मुळगावी ब्राम्हणवाडा येथे आप्त स्वकीय व पांचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

                       श्रीलंकेला ध्यान साधणेकरता गेले असता दि. 24 ला त्यांचा अपघात मृत्यू झाला होता. त्यांच्या सोबत देशविदेशातील 12 सहकारी होते, त्या पैकी प्रफुल्ल दादा सहीत 7 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रफुल्ल दादांचे पार्थिव दि. 27 ला श्रीलंकेवरुन विमानाने मुंबईला पोहोचले व तेथून गुरुकुंज मोझरी, तळेगाव, व मानव सेवाश्रम येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दादांचे पार्थिव किन्हाळा येथे त्यांच्या कुटीत एक तास दर्शना करीता ठेवण्यात आले होते.
                       नंतर तालुक्यातील जसापूर व गारपीट मार्गे ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. गाव प्रदिक्षणा करून अंत्यविधी करण्यात आला यावेळी विधानपरिषद आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.सरीता गाखरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदीश डोळे यांचेसह असंख्य गुरुदेव सेवक आणि हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

                        आचार्य प्रफुल्ल दादांच्या अचानक जाण्याने जनतेची आणि देशाची खुप मोठी हानी झाली, असे मत विभाकर ढोले शहर प्रमुख गुरुदेव सेवा मंडळ कारंजा, यांनी बोलतांना व्यक्त केले. ज्या मार्ग त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी आणण्यात आले. त्या गावात रस्त्यावर थांबून भाविकांनी अंत्यदर्शन घेतले. आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकही अंत्यसंस्काराला उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

0
0

Leave a Reply

Realted News