नागपूर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात
तान्हा पोळ्याच्या दिवशी २३ ऑगस्टला मद्यविक्री बंद
नागपूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तान्हा पोळा या सणाच्या दिवशी २३ ऑगस्टला नागपूर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व अनुज्ञप्तीधारक देशी व विदेशी मद्य विक्रीचे दुकाने, बिअर बार, ताडीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे.
नागपूर शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वित असलेल्या सर्व नमुना-ई, नमुना-ई-२, एफएलडब्ल्यू-२, सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, सीएलएफएलटिओडी-३, एफएल-३, एफएलबीआर-२, व टीडी-१ ही मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध नियमानुसार सक्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 11