फिलीपिन्सच्या ‘सेबू’ शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला
लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले, नुकसानीची तपासणी सुरू
कळमेश्वरचे ॲड. लंकेश गजभिये घटनेचे साक्षीदार/ प्रत्यक्षदर्शी यांची रिपोर्ट
फिलीपिन्स : सेबू (Cebu) I ॲड. लंकेश गजभिये
कळमेश्वर : आज दि. 30 सप्टें. मंगळवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.30 वाजता फिलीपिन्सच्या ‘कॅलापे’ येथे 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्रबिंदू ‘कॅलापे’ या बोहोल प्रांतातील सुमारे 33,000 लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेच्या शहरापासून सुमारे 11 किलोमीटर (सात मैल) पूर्व-दक्षिण पूर्वेकडे होते. सरकार आणि मदत पथके परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही.येथून जवळपास 103 कि. मी. दूर असलेल्या सेबू (Cebu) येथे ॲड. लंकेश गजभिये मुक्कामी आहेत. येथेही तितक्याच तिव्रतेचा भुकंप झाला आहे.

ॲड. लंकेश गजभिये आज फिलीपींन्सची राजधानी मनीला पासून 500 किलोमीटरवर सेबू (Cebu) शहरात आहेत. ॲड. लंकेश गजभिये हे कळमेश्वर येथे वकिलीचा व्यवसाय करतात. त्यांना पर्यटनाची आवड असून आतापर्यंत सात देशांमध्ये त्यांनी भ्रमंती केली आहे. आज ते फिलिपींन्सच्या सेबू शहरात मुक्कामी आहेत. फिलिपिन्स हे 7641 लहान मोठ्या बेटांनी तयार झालेला देश असून, जवळपास 11 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात बोटीने किंवा विमानानेच प्रवास सोयीचा ठरतो.
आज सायंकाळी फिलीपिंन्सच्या प्रमाण वेळेनुसार ॲड. गजभिये रात्री आठ वाजता जेवण करून आपले हाॅटेलमध्ये झोपण्याच्या तयारीत असताना अचानक हाॅटेलची अख्खी इमारत जोरजोराने हलायला लागल्याने, ते खाली रस्त्यावर धावत आले. तोवर आजूबाजूच्या वस्तीतील सर्व नागरिक, कुटुंबे घाबरून रस्त्यावर आले होते. प्रस्तुत प्रतिनिधी सोबत व्हिडिओ काॅल वर ॲड. गजभिये यांनी तेथील परिस्थितीचे लाईव्ह वर्णन केले. जवळपास अर्धा तास ते फेसबुक वर लाईव्ह होते. फिलिपिंन्सच्या नागरिकांसाठी भूकंपाचे रोज आठ ते दहा वेळा किरकोळ धक्के रोज बसत असल्याची तसेच आजचा हा भूकंपाचा धक्का अत्याधिक तीव्रतेचा म्हणजे 6.9 रिक्टर स्केलचा असून पहिल्यांदाच अनुभवल्याचे हाॅटेलच्या वेटरने ॲड. गजभिये यांना सांगितले.

भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नाही.
पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितले की, या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नाही. त्यांनी लोकांना घाबरू नका असा सल्ला दिला. सरकारने सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जरी भूकंपानंतर धक्क्यांचा धोका कायम आहे. पहिल्या मोठ्या भूकंपानंतर जेव्हा जमीन हलत राहते तेव्हा धक्के येतात. धक्के दिवस, आठवडे किंवा वर्षांनंतरही येऊ शकतात आणि त्यांची तीव्रता सुरुवातीच्या धक्क्यासारखीच किंवा त्याहूनही जास्त असू शकते.
फिलीपिन्स रिंग ऑफ फायर जवळ आहे
फिलीपिन्स रिंग ऑफ फायरजवळ आहे, त्यामुळे येथे भूकंप सामान्य आहेत. हा प्रदेश अनेक खंडीय आणि महासागरीय टेक्टॉनिक प्लेट्सचे घर आहे. या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, ज्यामुळे भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. जगातील ९०% भूकंप या रिंग ऑफ फायर प्रदेशात होतात. हा प्रदेश ४०,००० किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. जगातील ७५% सक्रिय ज्वालामुखी येथे आहेत.
जपान, रशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली आणि बोलिव्हिया हे रिंग ऑफ फायर जवळ आहेत.
कॅलापे येथे भूकंप होण्यापूर्वी काही वेळ आधी फिलीपिन्सच्या लेयते बेटावर 6.7 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जर्मन रिसर्च सेंटर फाॅर जिओसायन्सेस (GFZ) ने दिली. यूएसजीएसने सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.0 असल्याचे नोंदवले होते, मात्र नंतर ती दुरुस्त करून खाली आणल्याचे एपीच्या अहवालात नमूद केले आहे.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0