December 1, 2025 7:30 am

बॅरि. शेषराव वानखेडे जयंती निमित्ताने रक्तदान व रोग तपासणी शिबिराचे आयोजन

मोहपा येथे बॅरि. शेषराव वानखेडे जयंती निमित्ताने
३५ रक्त दात्यांचे रक्तदान

कळमेश्वर : मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात बॅरि. शेषराव वानखेडे यांची जयंती आणि राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
                         याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पालक संस्थेचे सचिव अरविंद धवड, नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. गौरी बेलापूरकर, चेतन मेश्राम जनसंपर्क अधिकारी, न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक शमसुद्दीन शेख प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. बेलापूरकर यांनी रक्तदानाबद्दलचे गैरसमज, अटी आणि रक्तदानाने होणारी फायदे याबद्दल विस्तृत विवेचन केले. सोसायटीचे सचिव अरविंद धवड, प्राचार्य डॉ. अलका थोडगे आणि मुख्याध्यापक शमसुद्दिन शेख यांनी बॅरि. नानासाहेबजी वानखेडे यांच्या जीवनपट उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख चितारला.

                        आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. महिलांसाठी स्वतंत्र तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात १२८ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ३५ रक्त दात्यांनी रक्तदान केले.
                         डॉ. लीलाधर खरपुरिये यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी कुसुमताई वानखेडे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय अंजनकर, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका नीता माकोडे, कल्पना खडसकर, रेखडे विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत धकिते यांचेसह डॉ. अजित जाचक, डॉ. विनोद भालेराव, डॉ. धनंजय देवते, डॉ. संजय ठवळे, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. पवन उमक, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. शुभम वाघ उपस्थित होते. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद वडते यांनी आभार मानले.
                         शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यशवंत हनवते, रफत अंजुम, पलक लिंगायत, निकिता लिमजे, लिया झिमोमी, उत्कर्षा खडसिंगे, पूजा पिंपळशेंडे, राहुल निके, अनिल कोठे, राकेश खोब्रागडे यांनी रक्त संकलन केले व यांचेसह या महाविद्यालयाचे कल्पना देवळे, अजय अंजनकर, रजनी गणोरकर, प्रदीप बगडे, अरविंद डहाट आणि प्रकाश कोकोडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News