♦ भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल कौतुक करणारी पोस्ट,
♦ शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे संतापल्या
जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल कौतुक करणारी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपने हा चिल्लरपणा बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील यावरून प्रश्न विचारले आहेत.










