भोतमांगे हत्याकांड स्मृतिनिमित्त खैरलांजीत श्रद्धांजली
मानवंदना देताना समत सैनिक दलाचे कार्यकर्ते आणि नागरिक
आंधळगाव : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गाजलेल्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावातील भोतमांगे परिवार हत्यांकांडाच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (२९ जुलै) खैरलांजी (ता. मोहाडी) या गावात श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली. समता सैनिक दल नागपूर आणि भंडाराच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते.
१९ वा स्मृतिदिन मानवंदना देऊन पाळण्यात आला
भोतमांगे परिवारातील मृत व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना करीत खैरलांजी गावात जावून त्यांच्या मृत्यूस्थळी श्रद्धांजली व मानवंदनाचा कार्यक्रम झाला. यावेळी रिपब्लिकन पार्टी नागपूरचे उपाध्यक्ष दिनेश अंडरशहारे, समता सैनिक दल नागपूर, समता सैनिक दल भंडारा येथील कार्यकर्त्यासह ५० ते ६० च्या संख्येतील समुदाय उपस्थित होता. आंधळगाव येथील ठाणेदार नितीन राठोड यांच्या उपस्थितीत यावेळी पोलिस आणि होमगार्डसह मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.










