देवेंद्र फडणवीस मराठा नाहीत, ही चूक आहे का? : ना. बावनकुळें
कोराडी : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचे मुख्यमंत्री याच भूमिकेचे आहेत. 50 वर्षे शरद पवार आणि काँग्रेसचे मराठा नेते मुख्यमंत्रिपदावर होते पण कधीही त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले हे सर्व फडणवीसांच्या सरकारमध्ये झाले, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यानंतर एकनाथ शिंदेंनी यासाठी पुढाकार घेतला आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेऊन आणि वेगवेगळ्या माध्यमातून मागण्या मान्य करत असतानाही बाकी नेत्यांना सोडून केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे त्यांच्याबद्दल एकेरी बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस मराठा नाही ही चूक आहे का?, खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे सुरू आहे ते योग्य नाही. तुम्ही मागण्या करा पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला टार्गेट करणं योग्य नाही.
काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढण्याची?
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याच भूमिकेतून आम्ही काम केले आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेमके मत काय याची स्पष्टता ली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून दुमत नाहीच पण काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले पाहिजे की मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपला निर्णय आहे का? किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावे या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची आरक्षणाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागास 353 जातीचा आणि 18 पगड जातीचा ओबीसी समाज यांचे आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचे का? हा जो संवैधानिक प्रश्न आहे, यावर काँग्रेसचे मत काय? त्यांनी जरा खुले समर्थन दिले असेल तर ते ओबीसी विरोधात आहे. ओबीसीच्या समर्थनार्थ राहुल गांधी एकीकडे बोलत असतात, जातीय जन-गणनेची मागणी करतात आणि दुसरीकडे असे नौटंकी करणे यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टता आली पाहिजे
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनोज जरांगे यांची भेट सरकारने घेतलीच पाहिजे. आंदोलनकर्त्यांचे मत आपण समजून घेतले पाहिजे पण कोणताही निर्णय घेत असताना एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं यावर शासन योग्य निर्णय घेईल. काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टता आली पाहिजे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचे मुख्यमंत्री याच भूमिकेचे आहेत.













Users Today : 3
Users Yesterday : 11