ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी
नागपूर : राज्यातील बहुजन घटकांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शासकीय पदांपर्यंत पोहोचण्याची दारे खुली करणारी सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेने २०२५-२६ या वर्षासाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाकरिता अर्ज मागवले आहे. ही योजना इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) मधील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा तसेच संयुक्त गट “ब’ व “क’ स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी ही अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज www.mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळावर २० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. प्रशिक्षणाबाबतची सर्व माहिती, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध आहे.
अनिवासी व ऑफलाईन माध्यमांतून प्रशिक्षण घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑफलाइन प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन तर प्रशिक्षणाच्या प्रारंभी एकरकमी आकस्मिक निधी मिळणार आहे. प्रशिक्षण नामांकित संस्थांमार्फत दिले जाणार असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल, असेही प्रशांत वावगे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले आहे.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तसेच महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले आहे.
ही योजना फक्त प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया आहे. यातून त्यांना केवळ ज्ञानच नव्हे, तर आत्मविश्वास आणि संधी मिळेल. राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन अतुल सावे यांनी केले आहे.
![]()
महाज्योती – UPSC / MPSC पूर्व‑प्रशिक्षण योजना (2025–26)
1. अर्ज प्रक्रिया (२०२५–२६ सत्र)
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर द्वारे “यूपीएससी, एमपीएससी आणि लष्कर भरती”साठी पूर्व‑प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून चालू आहे आणि अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा.Loksatta
अर्ज करताना आवश्यक डॉक्युमेंट्स (जात प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे इ.) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.Loksatta
2. लाभार्थींसाठी सुविधा
प्रशिक्षणात सहभागी झालेल्या पात्र विद्यार्थीांना विद्यावेतन आणि एकरकमी आकस्मिक निधी याची व्यवस्था करण्यात येणार आहे.Loksatta
3. महत्वपूर्ण योग्यता निकष
महाराष्ट्राचे निवासी असावे.
OBC, VJ, NT, SBC प्रवर्गातील नॉन‑क्रिमी लेयरमध्ये येणारे विद्यार्थी.
संबंधित परीक्षा (UPSC/MPSC) साठी शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी.

