February 7, 2026 8:38 am

महापुरुषांच्या विचारांचा जागर : डॉ. अजित जाचक

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

कळमेश्वर, मोहपा | दि. 12 जानेवारी 2026

                         मोहपा येथील बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

                         कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. अजित जाचक यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचा महाविद्यालयीन तरुणांनी अंगीकार केला पाहिजे, तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला.

                         इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय ठवळे यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे वाचन करून त्या विचारांच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाचा मार्ग निश्चित करावा, असे मार्गदर्शन केले.

                        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अलका थोडगे होत्या. त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

                         कार्यक्रमाला डॉ. धनंजय देवते, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. शुभम वाघ, श्रीमती कल्पना देवळे, अजय अंजनकर, रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रमोद वडते यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विनोद भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पवन उमक यांनी मानले.

0
0

Leave a Reply

Realted News