हर्षवर्धन सपकाळ यांची टीका; निवडणुकीतील आश्वासनांचा मागितला हिशोब
नागपूर : मोदी सरकारचा कारभार म्हणजे “बोलाचीच कढी बोलाचाच भात’ अशी स्थिती आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे माध्यमांशी बोलताना केली. हॅपी इंडेक्स, बेरोजगार, गरीब गरीब का झाला, २०१४ मध्ये २ कोटी नोकऱ्या देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार याचा लेखाजोखा दिला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी पेट्रोल दर, लोकपाल यांचे काय झाले याचे उत्तर दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने अहवाल दिला, त्यात हेट स्पीच म्हणून मोदींच नाव आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरचा लेखा जोखा, अदानी अंबानी यांची संपत्ती किती वाढली हेही सांगायला पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी एकत्री करणाबाबत काय निर्णय घ्यायचा हा दोन्ही राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ. ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याबद्दल तेच चांगल्या पद्धतीने सांगतील. महाराष्ट्रात अनेक समस्या आहे.
शेतकरी मुद्दे आहे, पीक कर्ज, पीक कर्ज माफी, संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. बी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये दिले गेले पाहिजे. या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरू आहे, असा पलटवार सपकाळ यांनी केला.आम्ही निर्णय घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर आमचे नेते आणि संघटितपणे निर्णय घेतील, ते आम्ही कळवले सुद्धा आहे. किरण कुलकर्णीची नार्को टेस्ट करायला हवी. मतांवर डल्ला मारला त्याचे सूत्रधार हे कुलकर्णी आहे.
संध्याकाळी सहा नंतर ७४ लाख मतदान कसे वाढले, हे ओपन सिक्रेट आहे.निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार अगोदर सुद्धा केलेली आहे. निवडणूक आयोग अमित शहा यांच्या सूचनेनुसार काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्या पूर्वी काँग्रेसचे शिष्ट मंडळ पुराव्यांशी निवडणूक आयोगात गेले होते. पाच वाजल्यानंतर मतदान ८.७४ % कसे वाढले हे सांगा. बच्चू कडू त्यांच्या मागणीवर किती दिवस कायम राहतात हे पाहु. या नंतरच काँग्रेस निर्णय घेईल.











Users Today : 0
Users Yesterday : 11