February 7, 2026 9:58 am

मोहपा नगरीत संविधान रॅली

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची उत्साहपूर्ण वातावरणात संविधान रॅली

मोहपा : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनच्या पथकांनी मोहपा नगरीत संविधान रॅली काढण्यात आली . रॅली महाविद्यालयातून रा तु म नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अजित जाचक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका थोडगे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ प्रमोद वडते यांनी संविधान रॅलीला हिरवी झेंडी देऊन पथकांना प्रोत्साहन दिले.

                        राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण वातावरणात ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ व ‘जय जवान जय किसान’ अशा प्रकारे घोषणा देत मोहपा नगरीत प्रभात फेरी काढली. महात्मा गांधीच्या पुतळ्या समोर नतमस्तक होऊन स्वयंसेवकांनी नारे देत नागरिकांमध्ये देशभक्ती व स्वातंत्र्याविषयी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. विनोद भालेराव, डॉ. लीलाधर खरपूरये, डॉ. धनंजय देवते, हरीश अंजनकर सचिन काळे, अनिता गणोरकर, शैलेश हातबुडे, पवन उमक व शुभम वाघ तसेच रा से यो 49 स्वयंसेवकांनी भाग घेतला.

0
0

Leave a Reply

Realted News