February 7, 2026 2:52 pm

मोहपा येथे बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

सुदृढ आरोग्यासाठी नियमित योग साधना आवश्यक : डॉ. कोल्हे

का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर

मोहपा : आज दिनांक 21 जून 2025 ला राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग अंतर्गत महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही .कोल्हे, होते तर अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाचे समन्वयक डॉ. लीलाधर खरपूरये, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ प्रमोद आसाराम वडते, रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अजित जाचक, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद भालेराव तसेच महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. धनंजय देवते यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला.

आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

                        या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कोल्हे यांनी योग ही साधना असून नियमितपणे योग करणे गरजेचे आहे. आपल्या सुदृढ व संपन्न आरोग्यासाठी योगाचा नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्यायोगे आपले आयुष्यमान वाढेल असे प्रतिपादन केले.
त्यानंतर शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. अलका थोडगे यांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सावन उके, पवन डोईफोडे, महेश निवल, तोहिद पठाण, जुनेद पठाण, अमन कुमरे निखिल धुर्वे, महेश निवल या सर्व विद्यार्थ्यांकडून योगा करून घेतला .
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा. सचिन काळे, शुभम वाघ, अजय अंजनकर, प्रकाश कोकोडे, अरविंद डहाट या सर्वांची सहकार्य लाभले. शेवटी शुभम वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.


0
0

Leave a Reply

Realted News