ग्रामीण भागाचा समतोल व शाश्वत विकास हेच माझे ध्येय : आ. डाॅ. आशिष देशमुख म्हणाले.
का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
कळमेश्वर : मोहपा शहरापासून 1 कि. मी. वर म्हसेपठार ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयाचा लोकार्पण सोहळा व भूमिगत नाली बांधकामाचे भूमीपूजन आमदार डाॅ. आशिष देशमूख यांचे शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी डाॅ.राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, बापूसाहेब हळदे, संदीप उपाध्याय, इमेश्वर यावलकर, प्रमोद हत्ती, संदीप उपाध्याय प्रामुख्याने उपस्थित होते.
विधानसभा क्षेत्रातील मोहपा-म्हसेपठार क्षेत्रामध्ये शेती विषयक शासकीय योजनांचा फायदा येणाऱ्या काळामध्ये मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न आवर्जून करू असा विश्वास आमदार डाॅ. आशिष देशमूख यांनी म्हसेपठारवासियांना दिला. ते म्हसेपठार ग्रामपंचायत च्या नविन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ग्रामपंचायत हे ग्रामीण विकासाचे मूलभूत व मध्यवर्ती केंद्र असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. ग्रामपंचायतच्या नव्या कार्यालयाच्या लोकार्पणानंतर गावातील प्रशासन आणखी प्रभावीपणे चालेल, असा विश्वास आमदार डाॅ. आशिष देशमूख यांनी व्यक्त केला. तसेच, गावाची स्वच्छता आणि आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला भूमिगत नाली प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत आहे.नागरी सुविधा अधिक सक्षम आणि दिर्घकाळ टिकाऊ व्हाव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांनी सचोटीने प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. ग्रामीण भागाचा समतोल व शाश्वत विकास हेच ध्येय असल्याचे व ते साध्य करण्यासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचे आ. डाॅ. आशिष देशमुख म्हणाले.
ते पुढे म्हणाले पंधरा दिवसांपूर्वी संजय कुबडे, बाबा बुरान, संदिप उपाध्ये सर्वजण मिळून आम्ही नाशिकचा, संभाजीनगरचा आणि जालनाचा दौरा केला. या भागांमध्ये असलेल्या फळांवर प्रक्रीया करण्यासोबतंच परदेशात त्यांच्या फहपिकांची मोठया प्रमाणावर निर्यात होत असल्यामुळे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. संत्रा, मोसंबी सारख्या फळांच्या भरघोस उत्पादनासाठी आपण सर्वतोपरी नक्कीच प्रयत्न करू.
शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या एपीएमसीच्या संचालकांना किंवा एपीएमसीला धडा शिकवण्याची गरज आहे. रामदेव बाबा, नितीन गडकरी यांचे माध्यमातून पाठपुरावा करत आज नागपूरच्या मिहान येथून नागपुरी संत्र्याचा ज्यूस माध्यमातून पतंजलीच्या माध्यमातून देशातच् नव्हे तर जगभरात पोहोचला आहे.
आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जंगली जनावरांच्या त्रासापासून संरक्षणसाठी झटका मशीन देण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी पालकमंत्री यांनी सुद्धा होकार दिला. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला दुधाचा व्यवसाय हा जोडधंदा म्हणून अत्यंत फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यामध्ये महिला को-आॅपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून मदर डेअरीसारख्या संस्थाचे निर्माण करता येइल, असेही आ. डाॅ. देशमुख म्हणाले.
यावेळी डाॅ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे यांनीही यथोचित संबोधन केले. तसेच माजी सरपंचांचा सत्त्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसेपठार ग्राम पंचायतच्या सरपंच प्रिया कुबडे यांनी तर संचालन लंकेश गजभिये यांनी केले. आभार प्रदर्शन उपसरपंच मिलिंद यावलकर यांनी केले.
याप्रसंगी माजी सरपंच, संजय कुबडे, दत्रातय कौटकर, शंकरराव गुळांदे, श्रीधर श्रीखंडे, युवराज भोयर, सिंधुताई श्रीखंडे, रत्नमाला आंबुलकर, सुनीताताई डहाट, पदमा माहोरे, विमल गजभिये, अमोल डहाट, प्रमोद गुळांदे, रामराम मोवाडे, संजय जिवतोडे, बाबा बुरान, कल्पना श्रीखंडे, सुनंदा कावडकर, मिलिद यावलकर यांच्यासह समस्त लाडक्या आया-बहिणी व मोठया संख्येने गांव व परिसरातील नागरिक मोठया सेख्येने उपस्थित होते.


