मोझरीच्या “गुरूकुंज आश्रम” ला जाणाऱ्या मार्गावर भव्य दिशादर्शक फलक लावा
श्रीगुरूदेव युवामंचाची मागणी
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर विश्वशांतीची प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ (मोझरी) आणि गुरूकुंज आश्रमला बायपास महामार्ग करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाधीस्थळाला क्षतीग्रस्थ होण्यापासून वाचवीले. आम्ही केलेल्या मागणीचा योग्य विचार शासकीय स्थरावरून केला, यासाठी श्रीगुरूदेव युवामंचाद्वारे गडकरीचे अभिनंदन केले आहे.
परंतू बायपासला नागपूर कडून जातांना वाडेकर पेट्रोल पंपाजवळ आणि अमरावती कडून येतांना शेंदोळा गावाजवळ दर्शनी गुरूकुंज आश्रमकडे जाणारे दिशादर्शक मोठे फलक लावावे. स्थानिक लोकंच् बुचकाळ्यात पडतात, त्यामुळे देश-विदेशातून या प्रेरणास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या अभ्यासक, पर्यटकांना काय त्रास होत असेल याचा महामार्ग प्राधीकरणाने विचार करावा. अशी मागणी श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी केली आहे.










