नागपूर: ३० एप्रील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस, ग्रामाचा जन्मदिवस म्हणून, ग्रामजयंती गावाच्या उन्नतीवर चिंतन-मंथन करून गावाच्या समृद्धीसाठी प्रयत्न करावा. हा उद्येश राष्ट्रसंतांचा होता. २००५ ला नागपूर विद्यापीठाचे नामविस्तार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर करण्यात आले. नामविस्तारानंतर पहिले कुलगुरू डाॅ. एस.एन. पठाण यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही श्रीगुरूदेव युवा मंच द्वारा एका निवेदनातून मागणी केली की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव विद्यापीठाला मिळाल्यामुळे त्यांची जयंती ३० एप्रील आणि ११ आक्टोंबर निर्वाणदिन कार्यक्रम विद्यापीठ स्थरावरून भव्यप्रमाणात व्याख्यान, चर्चासत्राद्वारे करण्यात यावा. कारण तो विद्यापीठाचा सन्मान आहे. कुलगुरू पठानांना आमच म्हणंन पटल. तशा लेखी सुचना त्यांनी विद्यापीठस्थरावर काढल्यात.
पण अलीकडे राष्ट्रसंतांचे नाव धारण केलेल्या विद्यापीठात त्यांचा जन्मदिवस आणि निर्वाण दिवसाला छोटेखानी कार्यक्रमाचे स्वरूप देत राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभागात मर्यादित केले आहे. दहावीस लोकांच्या उपस्थीत हा आदरांजली कार्यक्रम होतो. ३० एप्रीललाही तोच प्रकार घडला आहे. वक्ते थातूर मातूर बोलावल्या जातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा सन्मान आहे की विद्यापीठ स्थरावरून त्यांचा जाणीव पूर्वक अपमान केल्या जात आहे ? असा गंभीर प्रश्न श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक आणि विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजी अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी उपस्थीत करून याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.