मतचोरीवर प्रत्युत्तर : ठाकरे कफनचोरांचे सरदार- मुख्यमंत्री
लातूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने चार वेळा पत्र पाठवले. तरी ते आरोपांचे पुरावे देत नाहीत. त्यांना पराभव पचवता येतनाही, सहनही होत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांनाआम्ही कफन चोरांचे सरदार म्हटले तर चालेल का? असा सवाल उपस्थित केला.
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारीआले होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सोमवारी राज्यभर निदर्शने केली आणि मुख्यमंत्र्यांना चोरांचे सरदार का संबोधले, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत कोविड काळातकफन खरेदीत चोरी झाली.त्यामुळेआम्ही उद्धव ठाकरे यांना कफनचोरांचे सरदार म्हणायचे का ? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित होते.