नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुषाच्या शुभेच्छा !

यह बंधन कभी ना तुटे !

नागपूर I ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक 
                                        भारताच्या सरहदीवर उन,वारा, पाऊस अंगावर झेलत, डोळ्यात तेल घालून, देशाच रक्षण करणाऱ्या जवानांनमुळे आमची झोप सुखाची होते. अन्न पीकवीणाऱ्या शेतकरी मायबापामुळे आमच्या पोटाची खळगी भरते. यांच्या जीवावर आमच सुख, आमचा आनंद आहे. यांच्या जीवनात आनंदाचे आणि सुखाचे क्षण अबाधीत राहो हीच निसर्गचालकाला प्रार्थना ! राख्या त्या प्रेमाच प्रतीक हे बंधन अबाधीत राहो.

नागपूरकरांनी सैनिकांना राख्या पाठवून दिल्या दीर्घायुषाच्या शुभेच्छा !

                        मागील १९ वर्षापासून नागपूरकरांनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी स्वतः राख्या बनवून सैनिकांना पाठवून दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी नागपूरकरचे संयोजक डॉ. निखिल भुते यांच्या पुढाकाराने नागपूरातील सामाजिक, आध्यात्मीक, महाविद्यालयीन, सांस्कृतीक क्रिडा व सैनिक संघटनाच्या संकल्पनेतुन इंडियन आर्मी, कारगील पोस्ट (लद्दाख) भारतीय बॉर्डरवरील सैनिकासाठी बॉर्डरवर राख्या पाठविण्यात आल्या. नागपूरकरांच्या वतीने नागपूर महाराजा ट्रस्टचे राजे मुधोजी महाराज भोसले यांच्या प्रमुख हस्ते, श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, प्राचार्य विक्रांत चिलाटे, मिसेस युनिवर्स प्रविणा दाढे विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या माध्यमातुन बॉर्डरवर राख्या पाठविण्यात आल्या.

                       देशाच्या सिमेवर २४ तास पहारा देऊन देशातील सर्व नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राख्या पाठवून त्यांचा कार्याला सलाम करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नागपूरकरातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून या वर्षीही या अभियानांतर्गत सैनिकासाठी राखी पाठवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News