February 7, 2026 4:02 pm

रेखडे विद्यालय पिपळा  (किनखेङे) चा निकाल ९०.६३ टक्के, मुलींनीच मारली बाजी

♦ 81.60% गुण घेऊन कुमारी मनस्वी रवींद्र मानकर हि गुणानूक्रमे शाळेतुन प्रथम

काटा वृत्तसेवा : भुषण सवाईकर
मोहपा : 81.60% गुण घेऊन कुमारी मनस्वी रवींद्र मानकर हि गुणानूक्रमे शाळेतुन प्रथम तर 79.60% गुण घेऊन कु. अनुष्का सुनील धवड हीे दुसरया क्रमांकावर आली आहे. कु. अनुष्का महेंद्र जोगी हिने 76.80% गुण मिळवून तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे यावर्षी दहावीच्या परीक्षेला एकूण 32 विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात गुणानुक्रमे पहिल्या तिघीही मुलीच् आहेत.

संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कुंदाताई विजयकर तसेच सचिव अरविंद धवड, मुख्याध्यापक वसंत धकीते व शिक्षक संजय डेबे, प्रशांत कुंभारे, विजय करणाके, रामचंद्र मानमोडे, मनोहर कावडकर, श्रीमती अरुणा गुंडुले, अमोल लांडे, संदीप देशमुख इ.नी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


0
0

Leave a Reply

Realted News