December 1, 2025 7:02 am

वृद्धांसोबत फटाके विरहित प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी

आदासा व सावनेर येथील वृद्धाश्रमांत लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न

फटाक्यांऐवजी वृद्धांसोबत प्रदूषणमुक्त ‘अनोखी दिवाळी’ साजरी

का टा वृत्तसेवा I 
मोहपा प्रतिनिधी : आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रम आणि सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम येथे लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फटाके विरहित, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल, मोहपा आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

                         या उपक्रमांतर्गत फटाक्यांवर होणारा खर्च टाळून त्या पैशातून सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तू, फळे, उबदार शाली आणि पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धांना आनंदाचा अनुभव मिळाला आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा समाधानकारक क्षण अनेकांनी अनुभवला.

फटाक्यांऐवजी सेवा, सहवास आणि आनंद वाटप

                          कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि इतर मान्यवर व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

                          या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये न्यायमूर्ती कृष्णाजी श्रीखंडे, शंकरराव घोरसे, डॉ. उपेंद्र महात्मे, माजी नगराध्यक्षा शोभाताई कौटकर, माधवराव चर्जन, रत्नाकर चिमोटे, निलेश गुलांदे, अनिलराव चिमोटे, विजयराव मानमोडे, डॉ. प्रशांत महाजन, शैलेश बनसोड, गणेश बोबडे, राहुल गहुकर, श्वेतल लोणारे, संजयराव माकोडे, हर्षल यावलकर, विनय वंजारी, नंदकिशोर आखरे, शुद्धपाल गजभिये, मंदार कौटकर, हर्षदीप रंगारी, सोनू नारनवरे आणि अनेक सहकाऱ्यांचा समावेश होता.

                         या उपक्रमामुळे दिवाळीच्या सणाला एक सामाजिक आणि संवेदनशील पैलू लाभला असून, अशा प्रकारच्या उपक्रमांचे समाजात मोठे सकारात्मक परिणाम घडत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News