स्मृतिदिनी चांगल्या विचारांचा संकल्प करा : ज्ञानेश्वर रक्षक
का टा वृत्तसेवा
नागपूर : प्रत्येक सजिवाला जीवनाच सत्य मृत्यु आहे हे कळतं. पण याच मृत्युसंस्काराला अनंत अंधरूढ्यांनी ग्रासले आहे. ज्या आई-वडीलांनी आम्हाला हे सुंदर जग दाखवीले. त्याच आई-वडीलांच वृध्दत्व अनेक कुटुंबीयांना त्रासदायक वाटत. त्यातूनच वृध्दाश्रमासारखी विदेशी संस्कृती आज भारतात वाढतांना दिसते आहे.
आई-वडीलांच्या मृत्युनंतर त्यांच्या अस्थीसुध्दा घराबाहेर झाडाला टांगून, अथवा गोठ्यात ठेवण्यामागच शास्त्र काय असाव ? वडीलोपार्जीत संपत्तीचे वारसदार म्हणून मीरवणारे आम्ही त्यांच्या नावाचा सात-बारा, पैसाअडका, दागदागीने असे घराबाहेर ठेवतो का ? ज्या आई-वडीलांनी आपल्याला जन्म दिला ते आपल्यासाठी अशुभ कसे ठरू शकतात ? असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी अस्थिविसर्जन प्रसंगी झालेल्या श्रध्दांजली प्रार्थनेसभेत काढलेत.
![]()
त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचार सांगत मृतशरीराला नवीन पितांबर, कपडे घालण्यापेक्षा मृतव्यक्तीचे जूनेच स्वच्छ कपडे परिधान करां. नवीन कापड गरीबांचे अंग झाकण्यास कामात येईलं. मृत शरीराला तुप चोळणे, तेरवीच्या नावावर पैसा उधळणे म्हणजे गरीबाला कर्जबाजारी करणे आहे. आजही अनेक कुटुंबात आर्थीक विवंचनेमुळे रूग्नांच्या औषधौपचारावर खर्च करता येत नाही. याच चिंतन कोण करणार ? मृतांच स्मरण करणे म्हणजे चांगल्या विचारांचा संकल्प करणे. त्यांच्या नावे सत्कार्याला आपल्या परीस्थीप्रमाणे दान करणे ज्यातून समाज समृध्द होईल. असा विचार ज्ञानेश्वर रक्षक यांनी मांडला.
नागपूर शहरातील उद्योजक विजय केशवराव शेंडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी श्रीगुरूदेव मानव मंदिर येरला (फेटरी) जिल्हा नागपूर येथील कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृति शांतीवनातील अस्थिविसर्जन कुंडात श्रीगुरूदेव सुसंस्कार पध्दतीने करण्यात आला. याप्रसंगी शेंडे परिवारातील मान्यवरांची मोठ्याप्रमाणात उपस्थीती होती. महाराष्ट्र अंधश्रध्दा निमृलन समितीचे संजय शेंडे यांचे विजय शेंडे हे भाऊ आहेत.
![]()
2 Comments
Well done Dada
Love you
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. धन्यवाद!