♦ जम्मू-काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पात 2200 कोटींच्या फसवणुकीचा आरोप,
♦ अन्य 6 जणांचीही नावे
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टमधील अनियमिततेशी संबंधित आहे.
याच प्रकरणासंदर्भात सीबीआयने २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सत्यपाल मलिक यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. दिल्लीतील इतर २९ ठिकाणीही छापे टाकण्यात आले.
वास्तविक, सत्यपाल मलिक यांनी १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सांगितले होते की, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना ३०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारली. यानंतर, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या आदेशानुसार सीबीआयने एप्रिल २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला. मलिक ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल होते.
सत्यपाल मलिक रुग्णालयात दाखल, कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही












Users Today : 3
Users Yesterday : 11