कारंजा येथील ‘सनशाईन स्कूल’ जिल्हास्तरीय शालेय क्रीडा हॉलिबॉल स्पर्धेत उपविजेता
का टा वृत्तसेवा I
कारंजा (घा.) / प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा कार्यालय, वर्धा व्दारा आयोजित 14 वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धेत व्हॉलिबॉल क्रिडाप्रकारात सनशाईन स्कूल, कारंजाच्या चमू उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातुन उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेतून शाळेचा विद्यार्थी आर्यन भांगे याची गडचिरोली येथे होणार्या व्हॉलिबॉल विभागीय सरावासाठी निवड झाल्याने त्याचेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खेळाडूंना प्रशिक्षक व शाळेचे पर्यवेक्षक पवन ठाकरे तसेच अकॅडेमीक हेड हेमंत बन्नगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून खेळांडूंना घडविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. या विजयी चमूमध्ये वीर कावडकर, समर्थ दर्यापूरकर, आर्यन भांगे, मयांक राऊत, तन्मय सावरकर, नैतिक ढोके, प्रयास इंगळे, शिवम शेंदूरकर या खेळाडूंचा सहभाग आहे.
![]()
पं. स. कारंजाच्या गटशिक्षणाधिकारी वीणा धावडे, संस्थाध्यक्ष प्रेम महिले व सचिव विजय ठाकरे यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
![]()
![]()