नवी दिल्लीः उद्या शुक्रवारी ईद-उल-अजहा साजरी केली जाईल, त्यामुळे उद्या बँका सुरू, असतील की बंद ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
आरबीआयच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार उद्या ६ जून रोजी केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका बंद राहतील. इतर सर्व राज्यांमध्ये बँका खुल्या राहतील. मात्र ७ आणि ८ जून रोजी सर्व राज्यात बँका बंद असतील. ईद-उल-अजहा ६ जून रोजी साजरी केली जाईल. याला बकरी ईद असेही म्हणतात. ईद-उल-अजहामुळे देशातील एका राज्यात बँका बंद राहतील.
केरळमध्ये एसबीआय, पीएनबी, एचडीएफसीसारख्या सर्व सरकारी आणि खाजगी बँका बंद राहतील. ७ जून रोजी बकरी ईदमुळे बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर ८ जून हा रविवार आहे, म्हणजेच ६ ते ८ जूनपर्यंत सलग ३ दिवस बँका बंद राहतील.