ओटी…
तुझ्या गं आठवणीत
होई काळजाचं पाणी
किती आर्त हाक मारू
नाही पोहोचत कानी… १
लेकं म्हणून जन्मली
आई मी गं तुझ्या पोटी
कशी जगली आयुष्य
तू आम्हा लेकरांसाठी… २
मोठी झाली लेकं तुझी
तिची भर तू गं ओटी
वैरी झाला काळ आता
गेली तू गं ढगापाठी…. ३
माझ्या सुखी सोहळ्यात
का गं दूर राही अशी
मज वाटे मनोमनी
तू गं यावी पुन्हा जशी… ४
– पायल अंबडकर (गहुकर) मोहपा
One Comment
👌