त्र्यंबकेश्वर : श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना धडा कधी?
त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण; सुरक्षारक्षक निलंबित — श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना धडा कधी? नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला सुरक्षारक्षकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेचा खरा चेहरा या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाला असून अखेर चौघा सुरक्षारक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा…