कळमेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान ‘टप्पा १’

7 मार्च ते 15 मे २०२६ दरम्यान राबविणार
नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी व शक्यतो त्याच दिवशी उपलब्ध होणार

का टा वृत्तसेवा I 
कळमेश्वर : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’’ ‘टप्पा १’ कळमेश्वर तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहीती, कळमेश्वरचे तहसीलदार विकास बिक्कड यांनी दिली आहे. ते कळमेश्वर तहसील कार्यालयात आज आयोजीत पत्र परिषदेत बोलत होते.

या अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील तेलकामठी, गोंडखैरी व धापेवाडा या सर्व महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद मोहपा व नगर परिषद कळमेश्वर स्तरावर एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी व शक्यतो त्याच दिवशी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.

शिबिरांचे आयोजन पुढील वेळापत्रकानुसार मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे :

तेलकामठी           : शनिवार, दि. ७ मार्च २०२६
गोंडखैरी              : शुक्रवार, दि. 14 मार्च २०२६
धापेवाडा              : शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६
कळमेश्वर             : शुक्रवार, दि. 8 मे २०२६
मोहपा                 : शुक्रवार, दि. 15 मे २०२६

या समाधान शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचे निपटारा, ७/१२ व ८अ उतार्यांतील दुरुस्ती, डिजिटल ७/१२ उपलब्ध करून देणे, उत्पन्न, निवासी, जाती व नाॅन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, जमीन अभिलेख अद्ययावत करणे, अकृषक रूपांतरणाबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान तसेच तक्रार निवारण आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच नागरिकांना महाभूमी पोर्टलवरील QR कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्यांबाबत जनजागृती व प्रात्यक्षिके देण्यात येणार असून या सेवांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

तहसीलदार विकास बिक्कड पत्रपरिषदेला संबोधीत करतांना
तहसीलदार विकास बिक्कड पत्रपरिषदेला संबोधीत करतांना

तालुक्यातील सर्व नागरिकांनी या समाधान शिबिरांचा लाभ घेऊन महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे, तसेच शक्यतोवर नागरिकांनी आपल्या तक्रारी शिबीराचे तारखेपुर्वीच संबंधीत विभागाला (जेणेकरून नागरिकांचे संपुर्ण समाधान शिबीराचे नियोजीत तारखेला करता येईल) छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा शासन निर्णय 18.02.2026 (1)(3) (1) देण्याचे आवाहन कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे. पत्रपरिषदेला उपअधिक्षक भुमीअभिलेख  श्री. शिंदे व तहसिल कार्यालय समन्वयक बिलाल खान उपस्थित होते.

1
0

Leave a Reply

Realted News