रेखडे विद्यालय, पिपळा (किनखेडे) येथे स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार

पिपळा (किनखेडे) – रेखडे विद्यालय, पिपळा (किनखेडे) येथे आयोजित शालेय स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय अरविंदजी धवड, सचिव – मोहपा एज्युकेशन सोसायटी यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून माननीय श्री कैलासजी लोखंडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कळमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय श्री निशिकांत भोरे, साहेब संचालक – मोहपा एज्युकेशन सोसायटी; माननीय श्री शमशुद्दीन शेख, प्राचार्य – न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मोहपा; माननीय श्री अमोलजी फुलारे, सरपंच – ग्रामपंचायत पिपळा (किनखेडे); माननीय श्री प्रशांतजी कापसे, उपसरपंच; तसेच श्री युवराज गावंडे, अध्यक्ष – माजी विद्यार्थी संघ, रेखडे विद्यालय यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमातील पहिला आकर्षक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले तंत्रज्ञानाधारित व नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

मुख्याध्यापक वसंत धकिते यांनी प्रास्ताविक करून विद्यालयाच्या प्रगतीचा आणि माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन श्री डेबे सर यांनी प्रभावीपणे केले.

अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना माननीय अरविंदजी धवड म्हणाले,
“शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग द्यावा. शक्य असल्यास माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय दत्तक घेण्याचा विचारही करावा.”
त्यांचे हे आवाहन उत्साहाने स्वीकारत माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री कळसाईत सर यांनी,
“शाळेच्या विकासासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी सदैव सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत,”
असे ठाम आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार झाले. गुणवंतांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचे सोहळे आणि शाळेच्या विकासासाठीच्या रचनात्मक चर्चेमुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.

पालक, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण स्नेहसंमेलन व स्नेहमिलन सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

0
0

Leave a Reply

Realted News