१ जुलैला आझाद मैदानावर VLE संघटनेचा महासागर

१ जुलैला आझाद मैदानावर VLE संघटनेचा महासागर

राज्यभरातून हजारोंना मुंबईत धडक देण्याचे आवाहन

मंत्रालयावर दबाव वाढविण्यासाठी संघटनेची व्यापक रणनीती

का टा वृत्तसेवा I मुंबई/प्रतिनिधी  :
राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जुलै २०२६ (बुधवार) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि VLE (Village Level Entrepreneur) यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.

संघटनेने राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आंदोलन यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सरकारपर्यंत संघटनेचा आवाज पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

प्रत्येक तालुक्यात निवेदन; प्रशासनावर वाढणार दबाव

आंदोलनासोबतच प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याची मोहीमही राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातून निवेदने सादर झाल्यास मंत्रालयावर प्रभावी दबाव निर्माण होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

जिल्हाध्यक्ष, सचिव आणि तालुकाध्यक्षांना विशेष जबाबदारी

राज्य प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव आणि तालुकाध्यक्ष यांनी स्थानिक पदाधिकारी व VLE यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या दौऱ्यांदरम्यान नवीन सभासद नोंदणी मोहिमेलाही गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संघटन प्रमुखांकडून राज्यभर जनजागृती मोहीम

संघटनेचे सचिव विनोद तायडे,  संघटन प्रमुख योगेश राघवन (पुणे) यांनी विभागीय निरीक्षक, विभागीय उपाध्यक्ष, राज्य प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव आणि तालुकाध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून आंदोलनाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

                    राज्यभरातील VLE एकजूट दाखवत मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होवून सरकारला मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले असे संघटनेचे सचिव विनोद तायडे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे..

  • ▶️ १ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन
  • ▶️ महाराष्ट्रभरातील सर्व VLE व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन
  • ▶️ प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय
  • ▶️ प्रत्येक तालुक्यात जनजागृती आणि संघटन बळकटीकरणावर भर
  • ▶️ मोठ्या संख्येने सहभागासाठी राज्यभर संपर्क अभियान सुरू
0
0

Leave a Reply

Realted News