काटोल प्रभाग क्र. १० मध्ये मतदार प्रपत्र भरण्याचा विशेष कॅम्प यशस्वी, नागरिकांच्या सोयीसाठी कॅम्प आणखी दोन दिवस सुरू:-विजय महाजन.

.*काटोल प्रभाग क्र. १० मध्ये मतदार प्रपत्र भरण्याचा विशेष कॅम्प यशस्वी; नागरिकांच्या सोयीसाठी कॅम्प आणखी दोन दिवस सुरू:-विजय महाजन.*
काटोल, प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक १० मधील तार बाजार, खोजा ले-आऊट, फैलपुरा (श्रीकृष्ण नगर), चौबे ले-आऊट, लक्ष्मीनगर, हनुमान नगर, पांडे ले-आऊट, भस्मे ले-आऊट आणि सरस्वती नगर परिसरातील मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मतदार प्रपत्र (फॉर्म) भरणा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला असून नागरिकांच्या सोयीसाठी तो आणखी दोन दिवस निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रभागातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये आणि एसआयआर (SIR) प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण व्हावी, या उद्देशाने नगरसेवक तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विजय गंभीरराव महाजन आणि नगरसेविका सौ. सुलक्ष्मी सुकुमारजी घोडे यांच्या पुढाकाराने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
लक्ष्मीनगर येथील नगरसेवक विजय महाजन जनसंपर्क कार्यालय तसेच शाळा क्रमांक ११, चौबे ले-आऊट, काटोल येथे आयोजित या शिबिरात सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह आपले मतदार प्रपत्र भरून घेतले. आगामी मतदार यादीत नाव निश्चित राहावे आणि मतदानाचा घटनात्मक हक्क अबाधित राहावा, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, हा कॅम्प पुढील दोन दिवसही सुरू राहणार असून, ज्या नागरिकांचे प्रपत्र अद्याप भरायचे राहिले आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विजय महाजन व सौ. सुलक्ष्मी घोडे यांनी केले आहे.
कॅम्पची ठिकाणे :
नगरसेवक विजय महाजन जनसंपर्क कार्यालय, लक्ष्मीनगर, काटोल
शाळा क्रमांक ११, चौबे ले-आऊट, काटोल
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल क्रमांक आणि फोटो (असल्यास).
शिबिर यशस्वी करण्यासाठी बूथ क्रमांक १८२ च्या बीएलओ गायत्री मेटांगळे, बूथ क्रमांक १८३ च्या बीएलओ प्रियंका माळोदे, बूथ क्रमांक १८७ चे बीएलओ श्री. गायकवाड तसेच श्री. अक्षय ठाकरे यांनी मतदारांचे प्रपत्र स्वीकारून महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
याशिवाय सौ. सुनीता काळे, मनोज लुंगे, सुमित बबुटा आणि हर्ष बाबुळकर यांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
प्रभागातील उर्वरित पात्र मतदारांनी पुढील दोन दिवसांत आपले मतदार प्रपत्र भरून मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, असे आवाहन शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती विजय महाजन आणि नगरसेविका सौ. सुलक्ष्मी घोडे यांनी केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News