गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड; युवक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मोहपा : गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने शिवराय गणेश उत्सव मित्र मंडळ, मोहपा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोहपा येथे झालेल्या या उपक्रमाला युवक, मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली. संकलित रक्ताचा गरजू रुग्णांना उपयोग होणार असून, या उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यासही मदत झाली.

या उपक्रमासाठी लाईफ लाईन रक्तपेढी, नागपूर यांच्या पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ. अविनाश बाभरे, निशा मारकाम, अक्षय बिटले, कल्याणी कडू, नयनदीप केमेकर आणि प्रशांत राऊत यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले.
शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष हर्षदीप रंगारी, उपाध्यक्ष रजत ढोके, सचिव प्रज्ज्वल चिमोटे, सहसचिव संजोग वर्मा आणि कोषाध्यक्ष अमन पारेख यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
मंडळाच्या सदस्यांमध्ये मिनांशु ढगे, अभिषेक कावडकर, भूषण नेरकर, मंथन अंजनकर, सारंग मारोतकर, रोहित कोथळकर, प्रितम अंजनकर, नरेश कोल्हे, यश कामडी, प्रितम तरार, हर्षल बगडे, अथर्व ढोके, त्रोशिक गवळी, श्री ढगे, कामोद मारोतकर, यश कावडकर, रिहान शेख, विनल वाहणे, सुजल गायकवाड, विशेष वाहणे, मनीष वैद्य, अक्षय पुणेवार, कासिफ शेख आणि विवेक राऊळकर यांचा सहभाग होता. तसेच मोहपा येथील समस्त मित्र परिवाराने सहकार्य केले.
उपक्रमाला आकाशझेप फाउंडेशनचे सचिव साक्षोधन कडवे यांचेही सहकार्य लाभले. मार्गदर्शक वैभव तुरक व प्रविण साठवणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक उपक्रमांची चळवळ उभी राहावी आणि समाजातील गरजूंसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेश दिला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, कार्यकर्ते आणि संस्थांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून
भूषण सवाईकर : 📲 97645 07440







