कळमेश्वर येथे रक्तदान शिबिर, पर्यावरणदिना निमित्त रोपट्यांचे वाटप
का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
कळमेश्वर: भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. राजीव पोतदार यांचा वाढदिवस होमहवन, रक्तदान शिबिर तसेच पर्यावरण दिनानिमित्त रोपट्यांचे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच संलग्न संघटनांच्या वतीने डाॅ. पोतदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबारात ५१ तरूणांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. तसेच ‘पर्यावरण दिन’ निमीत्ताने शुभेच्छुकांना रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार आशिष देशमुख, ॲड. प्रकाश टेकाडे, मनोहर कुंभारे, इमेश्वर यावलकर, प्रमोद हत्ती, प्रकाश वरुळकर, स्मृती इखार, महादेव इखार, शिशुपाल तुरकर, मनोज शेंडे, डाॅ मनोहर काळे, प्रतीक कोल्हे, मंगेश चोरे, आदर्श पटले, संध्या गोतमारे, नरेश चरडे, मनोज चैरे, संजय मुलमुले, आनंद कदम, निलेश बुचुंडे, जीवन मुंगळे, सुरेंद्र शेंडे, किशोर मुसळे, पियुष बर्डे, नितीन पुरी, प्रमोद पिंपळे, राहुल वाहने, विजय देशमुख, शामराव सरोदे, चंद्रशेखर लांडे, स्वप्निल चौधरी, वैभव टेकाडे, शैलेंद्र आसोले, डाॅ. संजय घोडखांदे, सुनंदा लंगडे, मंगला शेटे, किशोर मुसळे, चंद्रशेखर लांडे, सचिन रघुवंशी यांच्यासह कळमेश्वर नागरिक सहकारी पतसंस्था, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, सातपुडा क्रीडा सांस्कृतिक मंडळ व इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डाॅ. पोतदार यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमीत्त आयोजित विवीध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी रवी खडसे, मुन्ना भुरे, राहुल धारपुरे, आशिष पटेल, मंगेश मांगे, अजय बोरे, सचिन रघुवंशी. प्रवीण काथवटे, रशीद शेख, मुकेश भरके, मंगेश केशरवाणी, आदित्य जिचकार, शंतनू कोल्हे यांनी सहकार्य केले.

रक्तदान करताना भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी.