December 1, 2025 6:11 am

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल!: जितेंद्र आव्हाड

बुद्ध, फुले, आंबेडकरांचा छळ करणारेच खरे दहशतवादी- जितेंद्र आव्हाड

मुंबई : “सनातनी दहशतवाद” ही संकल्पना आजची नाही, तर प्राचीन काळापासून सुरू आहे. भगवान बुद्ध, संत, समाजसुधारक, महापुरुष यांच्यावर अन्याय करणारे तेव्हाचे आणि आजचेही सनातनी दहशतवादीच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
                        जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते.

सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! जितेंद्र आव्हाडांची पोस्ट 

                         जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिख्यूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी

                         जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते. शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

एका वर्गाला शूद्र ठरवून मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच

                         जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते. माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते. आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्ती विरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.

प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्मा गांधींना मारणारे सनातनी दहशतवादीच 

                          जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्त्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला संपवण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News