August 15, 2025 3:04 am

कळमेश्वर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा समारोप

११५ अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप

काटा वृत्तसेवा I

कळमेश्वर : महसूल विभागाच्या वतीने आयोजित महसूल सप्ताहाचा समारोप तहसील कार्यालयात उत्साहात पार पडला. या सप्ताहादरम्यान आयोजित विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे ११५ अतिक्रमणधारकांना आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते कायदेशीर पट्टे वाटप करण्यात आले.
                        याप्रसंगी तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अजय वाटकर, धनराज देवके, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार विकास बिक्कड, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, उपअधीक्षक भूमी अभिलेख मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार ज्योती जाधव, आभा वाघमारे, तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार, पंचायत विस्तार अधिकारी बबन श्रृंगारे, आदी उपस्थित होते.
                          महसूल सप्ताहाअंतर्गत महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण, पांदण / शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंडळनिहाय समाधान शिबिर, विशेष साहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घर भेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे, आदी कामे करण्यात आली.
                          कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले. संचालन व आभार नायब तहसीलदार ज्योती जाधव यांनी मानले. कार्यक्रमास बिलाल खान, पवन चव्हाण, श्रेय भोपळे, ओमकार बांगर, आशिष चांभारे, अरविंद बेलेकर, सचिन बोराटे, आदींनी सहकार्य केले.
                          महसूल सप्ताहात बोरगाव (खुर्द) येथील ७४, साहुली येथील ३५, पिपळा (किनखेडे) येथील ३, परसोडी (वकील) येथील ३ असे एकूण ११५ नागरिकांना पट्टे वाटप करण्यात आले. महसूल सप्ताहादरम्यान डीबीटी झालेले लाभार्थी १३ हजार २११, पुरस्कृत कर्मचारी ११, सेवा पुस्तक अद्ययावत ५३, सेवानिवृत्ती प्रकरणे ४ निकाली काढण्यात आली. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यामध्ये तलाठी गजानन जोंधळेकर, प्रियंका काळे, क्रिस्टीना रफेल, अश्विनी वनारकर, अपूर्वा बोन्सुले, नीता मेंघरे, रोहिणी वाघमारे, पुरवठा निरीक्षक मंगेश ढवळे, संगणक परिचालक किरण भाकरे, आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News