कळमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

कळमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

का टा वृत्तसेवा I
कळमेश्वर : तालुक्यात ७८ वा स्वातंत्र्यदिन विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. सर्वत्र देशभक्तिपर गीते, ध्वजारोहण सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात अमूल्य योगदानाची आठवण करण्यात आली.

कळमेश्वर बाजार चौक, ध्वजारोहण

कळमेश्वर तहसील कार्यालय, ध्वजारोहण : विकास बिक्कड, तहसीलदार

                        तालुका प्रशासनाच्या वतीने शासकीय ध्वजारोहण समारंभ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. तहसीलदार विकास बिक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष डाॅ. राजीव पोतदार, सदस्य इमेश्वर यावलकर व संदिप उपाध्याय, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष अजय वाटकर, पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे, भूमी अभिलेख उपधिक्षक शिंदे, तहसील कार्यालयाचे अन्य अधिकारी नायब तहसीलदार आभा वाघमारे, संदिप तडसे, ज्योती जाधव यांचेसह महसुल व पोलीस दलाचे अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.
                        माजी नगराध्यक्षा स्मृती इखार, महादेव इखार, विलास गणोरकर, ज्येष्ठ नागरिक समितीचे कृष्णा बगडे, अरविंद रामावत, किशोर मंडलिक, सत्यवान मेश्राम, ब्रीजलाल रघुवंशी, राजु येसकर, सालोडकर गुरूजी, गिरडकर गुरूजी, राजु वऱ्हाडे, प्रमोद डांगे, युवराज मेश्राम, अरविंद ढोले इ. शेकडो नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालय समन्वयक तथा सहायक महसूल अधिकारी बिलाल खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
                         याशिवाय खालीलप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या घ्वजरोहणाचे कार्यक्रम कार्यालयाचे नावासमोर दिलेल्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोठया उत्साहाने रांपन्न झाले.

कळमेश्वर पंचायत समिती कार्यालय, ध्वजारोहण : अंशूजा गराटे, गट विकास अधिकारी


कळमेश्वर पोलीस स्टेशन, ध्वजारोहण : मनोज काळबांडे, पोलीस निरिक्षक


कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषद कार्यालय, ध्वजारोहण : आकाश सुरडकर, मुख्याधिकारी


म्युनिसिपल हायस्कुल व जु. काॅलेज कळमेश्वर, ध्वजारोहण : पोर्णिमा मेश्राम, मुख्याध्यापिका


भारतीय जनता पार्टी, कळमेश्वर-ब्राम्हणी मंडळ, ध्वजारोहण : राहुल तु. चांदुरकर


नगर काॅंग्रेस कमिटी, कळमेश्वर-ब्राम्हणी, ध्वजारोहण : संजय धोंगडी


                         शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, भाषणे, पथसंचलन, नाटिका यांद्वारे देशभक्तीचे प्रदर्शन केले. काही ठिकाणी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातही ग्रामपंचायती आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करून लोकांनी राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. 

                          स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काही सामाजिक संस्थांनी वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवले. नागरिकांमध्ये देशप्रेम जागृत करणाऱ्या घोषवाक्यांनी संपूर्ण जिल्हा देशभक्तीच्या वातावरणात न्हालेला दिसून आला.


 

0
0

Leave a Reply

Realted News