February 7, 2026 9:57 am

धामणगाव तहसील कार्यालयात महसूल सेवकांचे आंदोलन

चतुर्थ श्रेणीचा दर्जा न दिल्यास आजपासून महसूल मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात आंदोलनाचा इशारा

धामणगाव : महसूल सेवकांनाचतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनमान, सेवा सुविधा व निवृत्तीवेतन लागू करावे, या मागणीसाठी तहसील कार्यालयात महसूल सेवकांनी गुरुवार ११ सप्टे.रोजी आंदोलन करून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल. या आंदोलनात विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा, धामणगांव रेल्वेही सहभागी होईल, अशा इशारा देण्यात आला.
                       महसूल सेवक (कोतवाल) पदास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व शासकीय सेवकांप्रमाणे सर्व सुविधा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाने वारंवार आश्वासने देऊनही अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे महसूल सेवक संतप्त झाले आहेत. विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा करीत, नारेबाजीही केली.

0
0

Leave a Reply

Realted News