February 7, 2026 4:03 pm

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा

पांदण रस्त्यांनाही मिळणार स्वतंत्र ओळख : जिल्हाधिकारी विपीन इटनकर

का टा वृत्तसेवा I नागपूर : राज्य व राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच आता गावातील पांदण रस्त्यांनाही डॉ. विपीन इटनकर कोड नंबर दिले जाणार असून, त्यांना स्वतंत्र ओळख मिळणार आहे. शासनाने याबाबतचा शासन आदेश आधीच जारी केला आहे. सेवा पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यात याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
                         छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या सेवा पंधरवाडा कालावधीत नागपूर जिल्ह्यात शासकीय सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीवर आधारित अभियान राबविले जाणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी यावेळी दिली.
                          जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले की, सेवा पंधरवड्यामध्ये गावातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. त्यांना नंबर देऊन ते रस्ते नकाशावर आणले जातील. यासोबतच घरकुल योजना, पात्र असलेल्या गरजूंना पट्टे वाटप, तक्रार निवारणातून समाधान दिवस, जिवंत सातबारा व फेरफार, संजय गांधी निराधार योजना आदी राबविली जाईल. या कामांचे मूल्यमापन करून अशा गावांना सेव्हन स्टार महसुली गावसुद्धा जाहीर केले जाईल.
                       पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

0
0

3 Comments

  1. शेत रस्ता प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. शासनाने शेत रस्त्यावर सुरू केलेले अभियान अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे

  2. शेत रस्ता प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. शासनाने शेत रस्त्यावर सुरू केलेले अभियान अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे.माझे शेत क्रमांक 56 रामगिरी मोहपा.तहसील कळमेश्वर. डिस्ट्रिक्ट नागपूर .येथील शेत रस्त्याचा प्रॉब्लेम अजूनही सुरूच आहे . माझ्या शेत रस्त्याला शासनाने परवानगी द्यावी परवानगीचे पत्रक मिळाले तर तो रस्ता माझ्या सातबारावर दिसेल. आपण ही विनंती मान्य कराल हीच अपेक्षा आहे .आपली आभारी . रस्ता माझ्या सातबारावर दिसावा अशी माझी इच्छा आहे.

Leave a Reply

Realted News