महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा अंतर्गत
कळमेश्वर व काटोल तालुका कार्यकारीणी घोषीत
मोहपा : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा अंतर्गत नविन तालुका कार्यकारिणीची काल दि १३ ला कळमेश्वर येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे यांनी घोषणा केली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष वैभव तुरक, सरचिटणीस विनेश कावळे, सचिव विजय वालूकर, मार्गदर्शक धरमभाऊ अतकरे, संघटन सचिव रविंद्र नक्षिणे, संपर्कप्रमुख सतिष सुरुषे, मध्य नागपूर अध्यक्ष श्याम लांजेवार यांचे उपस्थितीत तसेच संघटक योगेश कापसे व सहसंघटक मनोज कडवे यांचे सहकार्याने कळमेश्वर तालुक्याची सक्रीय कार्यकारीणी तयार करण्यात आली.
तसेच काटोल येथे हनुमान मंदीरात आयोजीत येथे वरिल पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितांसह महाराष्ट्र नाभिक महामंडळ, विदर्भ उपाध्यक्ष मोहन निंबाळकर आणि नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राजेश डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटोल तालुक्याची सक्रीय कार्यकारिणी तयार करण्यात आली. यावेळी वरिलप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते.
दोन्ही तालुक्याच्या कार्यकारिणीच्या विस्तारासह घोषीत नवनियुक्त कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना सभेच्या अध्यक्षांनी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच नियुक्तीपत्र देऊन, पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
कळमेश्वर तालूका कार्यकारीणी :-
अध्यक्ष : निलेश मांडवकर, कार्याध्यक्ष : अनुप गाडगे व चंद्रकांत मांडवकर, उपाध्यक्ष : देवा राऊत व सचिव : सचिन शिरूळकर, सचिव : हरिश शिराळकर, सहसचिव : भोजराज नागपूरकर, सोनिलाल घोटीकर, संपर्क प्रमुख : मोरेश्वर भगत, संघटक : निलेय मिराशे व सहसंघटक राजू मांडवकर व अमित शिराळकर.

काटोल तालुका कार्यकारीणी :-
मार्गदर्शक : संजय कडु, अध्यक्ष : दीपक कडूकर, कार्याध्यक्ष : हर्ष बाभुळकर, उपाध्यक्ष : बाबाराव जुमळे व नरेश राजुरकर, सचिव : सुमित नागपूरकर, सहसचिव : प्रवीण लक्षणे, कोेषाध्यक्ष : शुभम तळखंडे, भोजराज इंगळे: संघटन सचिव, संघटक : अतुल धानोरकर, निरंजन सावरकर व विक्की बोरकर यांचेसह बाबाराव वाघमारे यांची नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.












Users Today : 3
Users Yesterday : 11