December 1, 2025 6:24 am

कारंजा घाडगे येथे ‘एकात्म मानवतावाद दर्शन हीरक महोत्सव २०२५’ साजरा

अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लोकशाहीच्या उद्दिष्टांची पूर्ती

काटा वृत्तसेवा I प्रतिनिधी
कारंजा घाडगे : आज 25 सप्टें. ला स्थानिक चक्रवर्ती राजा भोज शासकीय आय टी आय, येथे एकात्म मानवतावाद दर्शन हीरक महोत्सव २०२५ साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य एस. आर. कृष्णापुरकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ विनय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन बोरकर, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                         प्रमुख वक्ते डॉ विनय देशपांडे यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानव दर्शन, अंत्योदय योजना आदी बाबीवर विस्तृत मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील बचत गट, अंगणवाडी आणि शाळेमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात आला पाहिजे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, प्रत्येक विद्याथ्र्यांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, तरंच खऱ्या अर्थाने अंत्योदय योजनेच्या माध्यमातून लोकशाहीच्या उद्दिष्टांची पूर्ती होईल. हा मौलिक विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडला होता.
                          हाच विचार घेऊन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एकात्म मानववाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे डांगोरे यांनी  तर आभार प्रदर्शन सौ जुनघरे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News