सावनेर येथे नवरात्रीनिमित्त ‘लोकरंग कलाश्रृंगार गृह गरबा महोत्सव २०२५’
लोकरंग कलाश्रृंगार सांस्कृतिक कार्यक्रम – 8 वे पर्व
का टा वृत्तसेवा I प्रतिनिधी
सावनेर : ‘लोकरंग कलाश्रृंगार गृह, सावनेर’ यांच्या वतीने नवरात्रीनिमित्त लोकरंग गरबा महोत्सव २०२५ चे ८ वे पर्व तसेच समूह गरबा स्पर्धांचे दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी बालाजी लॉन, सावनेर येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमात खुल्या गरबा स्पर्धा आणि समूह गरबा स्पर्धांचा समावेश होता, ज्यात महिला, बालक आणि पुरुष कलाकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमासाठी भाजपा जि.ग्रा. सचिव रामराव मोवाडे, माजी नगरसेवक राजु घुगल, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक यशपाल डाहाके व्हॉईस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे, व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाकार्यकारिणी सदस्य राहुल सावजी, तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सावनेरवाला वरुण खुरसुंगे आणि ट्रेंडिंग सावजी यांची विशेष उपस्थिती लाभली.
विविध कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलेचे प्रदर्शन केले. तसेच खुला गरबा आणि समूह गरबा स्पर्धांमध्ये अनेक कलाकारांनी उत्कृष्ट गरबा सादर केला. याप्रसंगी विशेष प्रस्तुती म्हणून ‘नृत्यअरंगम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या परिनीता ठाकरे, आरोही जांगडे, केशवी पांडे, गार्गी पिसे, शामिली जांगड़े, कार्तिकी धोटे व पोर्णिमा वायकोले यांनी भरतनाट्यम शास्त्रीय नृत्यशैलीत अम्बा स्तुती सादर केली. प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार गुरु कुशल भट्टाचार्य यांनी कथ्थक नृत्य प्रकारात जगत जननी स्तुती आणि झपताल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘लोकरंग महिला कला मंच’च्या नमिता इलमकर, संगीता डोंगरे, पायल सूर्यवंशी, कविता सूर्यवंशी, कामीनी माडेकर, ममता पवार, भारती जांगड़े, वैष्णवी परिहार यांनी तमिळनाडू राज्यातील ‘कुम्मीअट्टम’ लोकनृत्य सादर केले.

यासोबतच ‘शिवार लोककला सामाजिक व सांस्कृतिक संस्था’च्या कलाकारांनी गोवा राज्यातील पारंपरिक ‘दीवली’ लोकनृत्याची मनमोहक प्रस्तुती दिली. समूह गरबा स्पर्धांमध्ये ‘डान्सिंग मिस्ट डब्लू.सी.एल गरबा ग्रुप’, ‘जगदंब गरबा ग्रुप’ व ‘प्रारंभ गरबा ग्रुप’ यांनी सहभाग घेऊन उत्तम सादरीकरण केले. या वर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘लोकरंग कलाभूषण नृत्य आचार्य सन्मान २०२५’ पुरस्कार. या पुरस्काराने कोलकाता येथील प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार गुरु कुशल भट्टाचार्य आणि शिवार लोककला सामाजिक व सांस्कृतिक संस्था, नागपूरचे संचालक सचिन श्यामराव दाभनेकर यांना ‘लोकरंग कलाश्रृंगार गृह’ टीम आणि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून ‘नृत्यअरंगम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’चे संचालक ऋषिकेश पोहनकर आणि पाश्चात्त्य नृत्य कलाकार व गरबा प्रशिक्षक रजत सोनुले यांची उपस्थिती लाभली. तसेच विशेष प्रस्तुतिकार म्हणून प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलाकार गुरु कुशल भट्टाचार्य ‘शिवार लोककला सामाजिक व सांस्कृतिक संस्था’चे प्रसिद्ध लोकनृत्य व लोककला कलाकार सचिन दाभनेकर, रविंद्र राजुरकर, सतीश भूरसे यांची उपस्थिती होती.
सर्व सहभागी आणि उत्तम प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यामध्ये बेस्ट ट्रेडिशनल वेशभूषा, बेस्ट दांडिया प्लेयर, बेस्ट एनर्जी टिक गरबा प्लेयर, बेस्ट युनिक ट्रेडिशनल लूक अशा विविध श्रेणींचा समावेश होता. विशेष प्रस्तुतीकारांना प्रमाणपत्र, भेटवस्तू व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन लोकरंग कलाश्रृंगार गृहच्या मीनाक्षी गजभिये, योगिता घोरमारे, सुवर्णा भगत, आकाश बरवड यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार एकता भेलोंडे यांनी केले. या आयोजनासाठी नमिता इलमकर, संगीता डोंगरे, पायल सूर्यवंशी,कामिनी माडेकर, ममता पवार, भारती जांगड़े यांच्यासह नंदराज डेकोरेशन, राजु वैद्य, ए.आर फोटो स्टुडिओ, दीपक राजगिरे, वैष्णवी परिहार, पूर्वा चौहान, अनिकेत ढाले, जनार्दन बरवड व चंदन बरवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.














Users Today : 3
Users Yesterday : 11