February 7, 2026 10:16 am

4 महिन्यांच्या बाळाला ड्रममध्ये बुडवून पित्याचीही आत्महत्या

बीडमधील घटना, दारूवरून पती-पत्नीत वाद

4 तासांपूर्वी :>
गेवराई : पतीच्या दारूच्या व्यसनामुळे नेहमी होणाऱ्या वादातून पती-पत्नी दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी दुपारी दसऱ्याच्या दिवशी दोघांची रुग्णालयातून सुटी झाली. रात्री जेवण करून दोघे झोपले. त्यानंतर पहाटे ३ वाजता आईने आपल्या ४ महिन्यांच्या बाळाला स्तनपान देऊन झोपी घातले. मात्र तासाभरात जाग आलेल्या पित्याने चिमुकल्याला आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. गेवराई तालुक्यातील रामनगर येथे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
                       अमोल हौसराव सोनवणे (३०) असे या घटनेत आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. तो ट्रकचालक होता, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी पायल हिच्याशी त्याचा वाद होत असे. ४ दिवसांपूर्वीही दोघांमध्ये असाच वाद झाला. भांडण टोकाला पोहोचले आणि दोघांनीही एकापाठोपाठ कीटकनाशक प्राशन केले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी दुपारी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. ४ महिन्यांचा मुलगा, दोघे पती, पत्नी इतर कुटुंबीय यांच्यासह दसरा साजरा करून, रात्री पायल, अमोल व चार महिन्यांचा मुलगा त्यांच्या खोलीत झाेपले. शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाळाला अमोलने घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बडवून मारले.

अमोलचे होते दुसरे लग्न

                       अमोल याचे पायलसोबत झालेले हे दुसरे लग्न होते. दोन वर्षांपूर्वी त्याचे पहिले लग्न झाले होते, मात्र काही महिन्यांतच सततच्या वादातून त्याची पहिली पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर दीड वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील पायल हिच्याशी त्याचे दुसरे लग्न झाले होते. पायल ही गरीब घरातील असून तिला आई नाही. ४ महिन्यांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला होता. अद्याप बाळाचे बारसे झाले नव्हते, त्यामुळे त्याचे नामकरण केले नव्हते. अमोल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद होत.

0
0

Leave a Reply

Realted News