February 7, 2026 4:27 pm

नाना पटोले यांच्या उपस्थितीत पदवीधर कार्यालयांचे उद्घाटन

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसची तडाखेबाज मोर्चेबांधणी

नाना पटोले यांच्या उपस्थितीत पदवीधर कार्यालयांचे उद्घाटन

नागपूर : नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक येण्यास साधारणतः वर्षभराचा कालावधी असला तरी, मतदार संघात भविष्यातल्या निवडणूकीसाठी तडाखेबाज मोर्चे बांधण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. नुकत्याच जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर, लाखनी आणि भंडारा तहसीलमध्ये कांग्रेसने अभिजित मुहूर्त साधत पदवीधर कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच खा. प्रशांत पडोळे आणि विद्यमान आ. अभिजित वंजारी, काँग्रेसचे महासचिव जिया पटेल, काँग्रेसचे शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. https://mahaelection.gov.in/
                         त्यासाठी जास्तीत जास्त पदविधरांपर्यंत पोहचण्याचे तसेच पदवीधर मतदार संघाची ताकद वाढवण्याचे आव्हान करण्यात आले आहे. विद्यमान आ. अभिजित वंजारी यांनी पदवीधरांच्या समस्या म्हणजेच रोजगार यावर भर दिल्याने प्रत्येक तहसीलमध्ये पदवीधारकांचे रोजगार मेळावे घेण्याचे ठरविण्यात आले. आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणूका २०२६ मध्ये होणार असून त्यासाठी नागपूर विभागाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरूवात झाल्याचे निदर्शनास येत असून या पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या हाती सत्ता आहे.
                         मागील निवडणूकीत अभिजित वंजारी यांनी पदवीधर महासंघात मताधिक्याने विजयश्री ओढून आणली होती. तर प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी यांचा निसटता पराभव झाला होता. निवडूण आल्यानंतर आ. अभिजित वंजारी यांनी पदवीधरांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांची रोजगारांची समस्या दूर व्हावी, जास्तीत जास्त पदवीधर जुळले यावे यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना भरपूर यश देखील मिळाले. परंतु मागील निवडणूकीचा काळ कोरोनाचा असल्याने आ. अभिजित वंजारी यांच्या कर्तृत्वावर कोरोनाची शाल ओढली गेली होती.
                        नंतर त्यांनी संपुर्ण ताकदीनिशी नागपूर विभागात पदवीधरांचा आवाज बुलंद ठेवला. आ. अभिजित वंजारी हे माजी आ. गोविंदराव वंजारी यांचे चिरंजीव असून त्यांना घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. एन एस युआय, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव असे संघटनस्तरावर त्यांनी भरपूर कामे करून या माध्यमातून युवक पदविधरांपर्यंत आपली पकड मजबूत ठेवली होती.
0
0

Leave a Reply

Realted News