कारंजा घाडगे येथील ‘गायत्री वाडकर’ एम फॉर्म मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम

एका सामान्य कुटुंबातील जिद्दी गायत्रीच्या यशाचे सर्वत्र कौतुक

का टा वृत्तसेवा I
कारंजा ( घा.) प्रयत्न व जिद्द यांची जोड मिळाली तर कठीण परिस्थितीवर मात करून यश खेचून आणता येते हे कारंजा घाडगे येथील कुमारी गायत्री राजू वाडकर हिने ( औषध निर्माण शास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी) एम फॉर्म मध्ये नागपूर विद्यापीठातून प्रथम येऊन सिद्ध केले आहे.
                         अतिशय सामान्य गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या गायत्रीने इयत्ता बारावी नंतर राम मेघे बी. फार्म. कॉलेज बोरगाव मेघे वर्धा येथे औषध निर्माण शास्त्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी बेसा नागपूर येथे फार्माकोलॉजी मध्ये एम फॉर्म पदव्युत्तर पदवी प्राप्त करून तिने नागपूर विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
                           महाविद्यालया मधूनच तिची पॅराग्ज्नल इंटरनॅशनल कंपनी हैदराबाद येथे तिची निवड झाली आहे. या क्षेत्रात क्लीनिकल रिसर्च आणि ड्रग सेफ्टीमध्ये नवीन ड्रग संशोधन झाल्यानंतर क्लीनिकल रिपोर्टिंग करणार असे तिने म्हटले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे.
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील गायत्रीच्या यशाचे कौतुक करत ग्रामगीता व शाल श्रीफळ देऊन तिचे अभिनंदन केले.

0
0

Leave a Reply

Realted News