कळमेश्वरमध्ये दिव्यांग सप्ताहाचा समारोप उत्साहात संपन्न
का टा वृत्तसेवा

कळमेश्वर | 11 डिसेंबर 2025 गटसाधन केंद्र, पंचायत समिती कळमेश्वर (शिक्षण विभाग) यांच्या वतीने दिनांक 3 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान राबविण्यात आलेल्या दिव्यांग सप्ताहाचा समारोप आज (गुरुवार) उत्साहात पार पडला. कळमेश्वर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, भत्ते, शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, अपंगत्व प्रमाणपत्र, UDID कार्ड यांसह उपलब्ध असलेल्या सुविधा व लाभांची सविस्तर माहिती देण्यात आली.
सप्ताहभर विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच दि.10 डिसेंबरला जनजागृती करीता रॅली काढण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावर माननीय श्री. कैलास लोखंडे, गटशिक्षणाधिकारी, यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी सौ. प्रगती सुनील जगताप यांची होती. त्यांच्यासह, शिक्षण विस्तार अधिकारी उमेससिंग कच्चवाह. विशेष शिक्षक अनिल कानफाडे, जयमाला मारसकोल्हे, किर्ती इटणकर, राणी कराळे ,अर्चना धांडे, जयमाला कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुबक संचालन हेमंत वाईकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोषण फुलझले यांनी केले.
10/12/2025 ला जनजागृती करीता रॕली काढण्यात आली










