February 7, 2026 7:09 am

मुंबईत 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त

मुंबईत 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, आयकर विभागाकडून चौकशी सुरू

मुंबई : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भरारी पथके कार्यरत आहेत. या पथकांकडून शहरातील विविध भागांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे.

                         या पार्श्वभूमीवर मुंबईतील देवनार परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत दोन वाहनांमधून एकूण 2 कोटी 33 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. वाहनांची तपासणी दरम्यान ही रक्कम आढळून आल्यानंतर ती तातडीने ताब्यात घेण्यात आली.

                          संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी वाहतूक केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने, आयकर विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

                            या घटनेची नोंद देवनार पोलिस ठाण्यात स्टेशन डायरीत करण्यात आली असून, जप्त केलेली रोकड सध्या पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सदर रक्कम नेमकी कुठून आली, कोणाच्या मालकीची आहे आणि तिचा वापर कशासाठी होणार होता, याबाबत आयकर विभाग आणि पोलिस प्रशासन संयुक्तपणे तपास करत आहेत.

                             निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुढील काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News