दहावीची परीक्षा आजपासून

दहावीची परीक्षा आजपासून;

राज्यभरात १६ लाख विद्यार्थी, कॉपीमुक्त अभियानासाठी २७१ भरारी पथके

पुणे | काटा वृत्तसेवा
                        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत फेब्रुवारी–मार्च सत्रातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा आजपासून (शुक्रवार, २० फेब्रुवारी) सुरू होत असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.

                         ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. यंदा राज्यभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

                        परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून गैरप्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News