आजपासून रेल्वेने प्रवास करणे महागले
एसीमध्ये १००० किमी प्रवासासाठी तुम्हाला २० रुपये, तर नाॅन-एसी मेल/एक्सप्रेस साठी १० रुपये जास्त द्यावे लागतील
का टा वृत्तसेवा
मुंबई : या जुलै मध्ये झालेल्या महत्वपुर्ण बदलात आज पासून रेल्वेचा प्रवास करणे महाग झाल आहे. तसेच तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक करणेसुद्धा अनिवार्य झाले आहे.
आजपासून रेल्वे प्रवास महाग झाला आहे. नाॅन-एसी मेल/एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ पैसे आणि एसी क्लासचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढवण्यात आले आहे. रेल्वेला होणारा वाढता खर्च आणि देखभाल खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेने नाॅन-एसी मेल/एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किमी १ पैसे वाढवले आहे. तर, एसी क्लाससाठी (जसे की एसी २ -टायर, एसी ३-टायर) २ पैसे प्रति किमी वाढ होईल. म्हणजेच जर तुम्ही ५०० किमी प्रवास करत असाल तर तुम्हाला नाॅन-एसीमध्ये ५ रुपये आणि एसीमध्ये १० रुपये जास्त द्यावे लागू शकतात. दुसरीकडे, १००० किमीच्या प्रवासासाठी तुम्हाला एसीमध्ये २० रुपये आणि नाॅन-एसीमध्ये १० रुपये जास्त द्यावे लागतील.
तात्काळ तिकीट बुकिंग : आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक असणे आवश्यक
आता, तत्काळ तिकिटे बुक करताना, प्रवाशांना आधारद्वारे डिजिटल पडताळणी करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमचा आधार आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावा लागेल. आधार पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांना तिकीट बुकिंग दरम्यान ओटीपी मिळेल, जो एंटर करून ते पडताळणी पूर्ण करू शकतील आणि तिकीट बुक करू शकतील.
तत्काळ बुकिंग विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत, ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधार कार्डने सत्यापित केले आहे त्यांनाच तिकिटे बुक करण्याची परवानगी असेल. आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट देखील विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत तिकिटे बुक करू शकणार नाहीत, परिणामी अनधिक्त दलाल आणि बाॅट्सवर प्रतिबंध बसेल.
या बदलामुळे गरजू आणि खऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल. यामुळे बनावट आयडी, फसवे एजंट आणि बाॅट्स वापरून होणाऱ्या बुकिंगला आळा बसेल आणि सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळणे सोपे होईल.