December 1, 2025 6:16 am

KAMAKSHI : कामाक्षी सेलिब्रेशनतर्फे “दिवाळी मिलन संध्याकाळ २०२५” जल्लोषात साजरी

कामाक्षी सेलिब्रेशनतर्फे “दिवाळी मिलन संध्याकाळ २०२५” जल्लोषात साजरी

सावनेर : सावनेर येथील कामाक्षी सेलिब्रेशन (घाटोडे परिवार) तर्फे आयोजित “दिवाळी मिलन संध्याकाळ २०२५” हा कार्यक्रम उत्साह, स्नेह आणि आनंदाच्या वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आला. हा उपक्रम सौं. अश्विनी घाटोडे यांच्या संकल्पनेतून २२ ऑक्टोबर रोजी सायं. ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत पार पडला.
                         “एकत्र येऊया प्रकाशात, आनंदाच्या रंगात, दिवाळी मिलनात” या अर्थपूर्ण घोषवाक्याने सजलेल्या कार्यक्रमात हास्य, संवाद आणि एकतेची भावना अनुभवायला मिळाली. मित्रपरिवार, महिला मंडळ आणि चिमुकले अशा सर्वांनी मिळून दिवाळीचा उत्सव स्नेहपूर्ण वातावरणात साजरा केला.

                          कार्यक्रमातील “ओपन माईक सेशन” या विशेष उपक्रमात सहभागी झालेल्यांनी आपली गायनकला, कविता तसेच बालपणीच्या दिवाळीच्या आठवणींनी वातावरण रंगतदार केले. तसेच “संगीत खुर्ची” या खेळात महिला व पुरुष सहभागी होत हशा आणि आनंदाचा वर्षाव घडवून आणला.
                           स्वादिष्ट खाद्यपदार्थ, आनंददायी संगीत आणि मैत्रीपूर्ण गप्पांमुळे प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या अखेरीस सावनेर मित्र परिवार व चिमुकल्यांनी एकत्रितपणे आकाशकंदील प्रज्वलित करून फुलझड्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून टाकला.

                           या अविस्मरणीय दिवाळी मिलन संध्याकाळीचा समारोप प्रकाश, आनंद आणि एकतेच्या संदेशाने झाला. यशस्वी आयोजनाबद्दल कामाक्षी सेलिब्रेशन (घाटोडे परिवार) यांचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात स्नेह, मैत्री आणि एकतेचे बंध अधिक घट्ट होतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News