February 7, 2026 7:20 am

PM Modi : जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना योग शांतीची दिशा दाखवतो

योगाला एक जनआंदोलन बनवण्याची गरज आहे : पंतप्रधान मोदी

191 देशांत, 1,300 ठिकाणी कार्यक्रमात 3 लाख लोकांची उपस्थिती

नवी दिल्ली/ विशाखापट्टणम : जगभरात आज शनिवारी ११ वा योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी विशाखापट्टणममध्ये ३ लाख लोक आणि ४० देशांतील राजदूतांसोबत योग करतील. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, योग म्हणजे जोडणे आणि योगाने संपूर्ण जगाला कसे जोडले आहे, हे पाहणे आनंददायी आहे.
                       ते म्हणाले की ज्या दिवशी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखण्याचा प्रस्ताव मांडला, त्या दिवशी जगातील १७५ देशांनी आमच्या प्रस्तावाला सर्वात कमी वेळात पाठिंबा दिला. आज जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना योग शांतीची दिशा दाखवतो. मोदी म्हणाले की, आजच्या जगात असा पाठिंबा देणे ही सामान्य गोष्ट नाही. आज जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना योग शांतीची दिशा दाखवतो. तर मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता.
PM Modi : जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना
PM Modi : जगात अशांतता आणि अस्थिरता वाढत असताना
                       आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देखील पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर योगा करताना दिसतील. यावेळी योगाचा विषय ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ आहे. हा कार्यक्रम देशभरात १ लाखाहून अधिक ठिकाणी आयोजित होणार्या ‘योग संगम’ शी जोडला जाईल. यात २ कोटींहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या मते, १९१ देशांमध्ये १,३०० ठिकाणी २,००० हून अधिक योग कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती आहे.
                         पंतप्रधान म्हणाले की आज योग दिनी मी सर्वांचे लक्ष लठ्ठपणाकडे वेधू इच्छितो. वाढत्या लठ्ठपणा हे जगासाठी एक आव्हान आहे. मी मन की बातमध्ये देखील याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. मी आपल्या अन्नातील तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
                         चला योगाला एक जनआंदोलन बनवूया. जे जगाला शांती, आरोग्य आणि सौहार्दाकडे घेऊन जाते. जिथे माणूस योगाने दिवसाची सुरुवात करतो आणि जीवनात संतुलन शोधतो. जिथे योग मानवतेला एकत्र बांधण्याचे माध्यम बनतो.



0
0

Leave a Reply

Realted News