Untimely Transfer : नागपूर जिल्ह्यातील सहा तहसीलदारांच्या बदल्या

महसूल मंत्रालयाचा निर्णय : सहसचिवांनी केले आदेश जारी

का टा वृत्तसेवा 
नागपूर : महसूल मंत्रालयाने राज्यातील काही तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील सहा तहसीलदारांचा समावेश आहे. महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये यांनी या सर्व बदल्यांचे आदेश काल मंगळवारी (दि. १) निर्गमित केले आहेत.
                         नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार (सामान्य प्रशासन) अक्षय पोयाम यांची बदली सावनेर तहसील कार्यालयात करण्यात आली असून, सावनेरचे तहसीलदार रवींद्र होळी यांची नियुक्ती बेला (ता. उमरेड) येथे अप्पर तहसीलदारपदी करण्यात आली आहे. बेल्याचे अप्पर तहसीलदार विकास बिक्कड यांची बदली कळमेश्वरच्या तहसीलदारपदी करण्यात आल्याने कळमेश्वरच्या तहसीलदार रोशन मकवाने यांची बदली नागपूर कार्यालयातील अप्पर तहसीलदार अमित घाटगे यांच्या जागी करण्यात आली आहे.
                          भिवापूरचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांची बदली नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात तहसीलदारपदी करण्यात आली असून, नागपूर ग्रामीणचे तहसीलदार बाबासाहेब टेळे यांची बदली भिवापूर येथील तहसीलदारपदी करण्यात आली. कुहीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांची बदली नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदार (सामान्य प्रशासन) पदी करण्यात आली असून, अमित घाटगे हे कुहीचे नवीन तहसीलदार राहणार आहेत.

Preview Changes (opens in a new tab)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News